पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व’
पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या विशिष्ट अधिवासात व नैसर्गिक परिस्थितीत जगते, त्या सर्व पाश्र्वभूमीला सर्वसाधारणपणे ‘पर्यावरण’ असे म्हटले जाते. या पर्यावरणातील एक घटक म्हणजे माणूस. या माणसाच्या बुद्धिमत्तेमुळे आज पृथ्वीवर त्याचे अधिपत्य आहे. त्यामुळे उन्मत्त होऊन पर्यावरणाची पर्वा न करता त्याने विकास साध्य करण्याचे ठरविले तर तो विकास साबणाच्या फुग्याप्रमाणे

आकर्षक दिसेल पण क्षणभंगूर ठरेल.
या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, म्हणून प्रदूषणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व त्यातून चिरंतन विकास साध्य करण्यासाठी प्रामुख्याने पुढील उपाययोजना करता येतील.
१) पर्यावरणाबाबत जागृती व शिक्षण : अलीकडे पर्यावरण शिक्षणाचा शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश झाला, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लहान वयातच पर्यावरण समस्यांची जाणीव झाली तर मोठेपणी आपली जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणाची काळजी घेणारे सुजाण नागरिक निर्माण होण्यास मदत होईल. पर्यावरणासंबंधीची माहिती व्याख्यानांद्वारे, प्रदर्शनाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांनी चंगळवादी जीवनशैली न स्वीकारता पर्यावरण- सुसंवादी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे ठरेल.
२) कायदे व नियम - पर्यावरणाला हानिकारक कृती करणाऱ्यांवर कठोर कायद्यांचा वापर करून दंडात्मक कारवाई झाली तरच समाजाला शिस्त लागेल व बेजबाबदार वर्तणुकीला आळा बसेल. या कडक कायद्यांमुळेच सिंगापूर स्वच्छ आहे.
३) नावीन्याचा शोध : प्लॅस्टिकसारख्या मानवनिर्मित अनेक घटकांमुळे पर्यावरणाची हानी झाली असली, तरीही पूर्वीच्या अनुभवावरून शहाणे होऊन नवीन पर्यावरण सुसंवादी सामग्रीचा शोध चालू ठेवायला हवा तरच विकास आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये संतुलन राखता येईल व पर्यावरणाची हानी न करता विकास साध्य करता येईल.
४) पर्यायी साधनसंपत्तीचा शोध : खनिज तेल, कोळसा यासारखी ऊर्जा निर्माण करणारी साधनसंपत्ती वापरल्यावर नष्ट होते व त्यामुळे काही वर्षांनी ही साधनसंपत्ती संपुष्टात येईल. ती अधिक काळ वापरता यावी यासाठी सध्या खनिज तेलाच्या जागी जलविद्युत वापरता येणे शक्य आहे का? बसने प्रवास करण्याऐवजी विजेवर चालणाऱ्या ट्रेनने प्रवास केल्यास खनिज तेलाची बचत होईल. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्जऐवजी कापडी पिशवीचा वापर करणे चांगले. रासायनिक खतांपेक्षा शेणाचा वापर अधिक पर्यावरण सुसंवादी आहे.
५) पुनर्वापर : एखादी वस्तू वापरून झाल्यावर लगेच टाकून देण्याऐवजी तिचा पुनर्वापर करता येईल का, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या अवती-भवती असणाऱ्या अनेक घटकांचा आपण पुनर्वापर करू शकतो. उदा. शेण टाकून देण्यापेक्षा त्याचा बायोगॅस निर्मितीसाठी वापर करता येईल. तसेच नैसर्गिक खत म्हणूनही वापर करता येईल.
६) साधनसंपत्तीचे संवर्धन : पाण्याला जीवन असे संबोधले जाते. खरोखरच पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवनच संपुष्टात येईल व त्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. तसेच, वनस्पतींच्या वाढीसाठी माती अत्यावश्यक आहे व त्यामुळे मृदेचे संवर्धन महत्त्वाचे आहे. तर, डोंगर उतारावर झाडे लावल्यामुळे मातीची धूप कमी होते, जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढते. एकंदरीत परिसंस्थेचे संतुलन कायम राखण्यासाठी वनांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. अशा तऱ्हेने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण सुसंवादी जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. यासाठी हाव न धरता, पर्यावरणातील घटक ओरबाडून न घेता आवश्यक तेवढेच गरजेपुरते घेतले पाहिजे. अशा प्रकारे ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून प्रत्येकाने प्रत्येक दिवशी पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

good one
ReplyDeletegood work
ReplyDeletegood info
ReplyDeletenice blog
ReplyDeletenice info
ReplyDeletenice
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteNice
ReplyDeleteपर्यावरण व्यवस्थापन
ReplyDeleteकार्य पध्दती
ReplyDeleteकार्य पध्दती
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteek no.
ReplyDeleteOr nahi kya
ReplyDeleteMahattav
ReplyDeleteनिरीक्षण
ReplyDeleteNice
ReplyDelete