Posts

पर्यावरण संवर्धन

Image
पर्यावरण संवर्धन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व’ पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या विशिष्ट अधिवासात व नैसर्गिक परिस्थितीत जगते, त्या सर्व पाश्र्वभूमीला सर्वसाधारणपणे ‘पर्यावरण’ असे म्हटले जाते. या पर्यावरणातील एक घटक म्हणजे माणूस. या माणसाच्या बुद्धिमत्तेमुळे आज पृथ्वीवर त्याचे अधिपत्य आहे. त्यामुळे उन्मत्त होऊन पर्यावरणाची पर्वा न करता त्याने विकास साध्य करण्याचे ठरविले तर तो विकास साबणाच्या फुग्याप्रमाणे   आकर्षक दिसेल पण क्षणभंगूर ठरेल. या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, म्हणून प्रदूषणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व त्यातून चिरंतन विकास साध्य करण्यासाठी प्रामुख्याने पुढील उपाययोजना करता येतील. १) पर्यावरणाबाबत जागृती व शिक्षण : अलीकडे पर्यावरण शिक्षणाचा शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश झाला, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे...